Ayodhya Ram Mandir : 'रामलल्ला' ला लागला होळीचा गुलाल, पाहा फोटो...
भारतातील प्रत्येकजण होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो आणि हा रंगांचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडतो. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा 24 होलिका दहन, तर 25 मार्चला रंगपंचमीचा उत्सव रंगणार आहे. रंगांचा हा सण आयुष्यात अनेक आनंद घेऊन येतो. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
उत्तर प्रदेशातील मथुरा आणि काशीमध्ये होळीचा उत्सवाला सुरुवात झाली आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
होळीच्या पाश्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिरही होळीच्या रंगात रंगून गेले आहे. Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
या वर्षीची होळी राम भक्तांसाठी विशेष असणार आहे, कारण रामलल्ला त्याच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
'रामलल्ला' ला होळीचा गुलाल लावण्यात आला आहे. काल एकादशीनिमित्त प्रभू 'रामलल्ला'ला अबीर आणि गुलाल लावण्यात आला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
रत्नजडीत सुवर्णालंकारांनी प्रभू श्रीरामाला सजवण्यात आलं आहे. 'रामलल्ला'च हे रुप अतिशय दिव्य दिसत आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
परमेश्वराचं मनमोहक रूप, आभूषणं आणि वस्त्र पाहून सारं जग थक्क झालं आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारं श्रीरामाचं रुप पाहून अख्खा देश भारावून गेला आहे. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)
वैदिक मंत्रोच्चार आणि अभिजीत मुहूर्तावर रामाच्या बालस्वरुपी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. (Photo credit : Twitter/@ShriRamTeerth)