PM Kisan Yojana मधील पैसे लवकरच येणार बँक खात्यात, त्याआधी 'हे' काम पूर्ण करा
भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. देशाच्या एकूण जीडीपीपैकी १७ ते १८ टक्के हिस्सा कृषी क्षेत्रातून येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू आहेत. केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधी योजना सुरू आहे. या योजनेद्वारे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.
या योजनेनुसार केंद्र सरकार दर वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये देण्यात येतात. वर्षातून तीन वेळेस प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हफ्ता दिला जातो. केंद्र सरकारने या योजनेचा 10 वा हफ्ता जानेवारी महिन्यात दिला होता.
आता केंद्र सरकार एप्रिल महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 वा हफ्ता देणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच केवायसी अपडेट करावा लागणार आहे. KYC असल्याशिवाय हा निधी बँक खात्यात जमा होणार नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे KYC अपडेट करू शकता.
ई-केवायसी करण्यासाठी, तुम्ही प्रथम पीएम किसानम सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. येथे तुम्हाला e-KYC चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, तुम्ही येथे आधार कार्ड क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून ओटीपी भरा. यानंतर तुमचे केवायसी अपडेट होईल.
याशिवाय तुम्ही www.pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन आधार Kisan Corner वर क्लिक करू शकता. यानंतर तुम्ही एडिट आधार फेल्युअर रेकॉर्डचा पर्याय निवडा. यानंतर तुमचा आधार आणि मोबाईल नंबर इथे टाका. त्यानंतर तुम्ही OTP टाका आणि सबमिट करा. तुमचे ई-केवायसी अपडेट केले जाईल.