Holi 2022 India: होळीची पौराणिक कथा!
हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता.
परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला.
आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती.
होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली.
तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव देशभरात साजरा होऊ लागला.
अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.