Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.क्लॉस श्वाब यांनी त्यांच्या पत्नी श्रीमती हिल्डे श्वाब यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाप्रसंगी श्वाब दांपत्याच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यासमयी श्वाब दांपत्याचा शाल, श्रीफळ तसेच गणरायाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी दररोज विविध मान्यवरांच्याहस्ते श्री गणेशाची आरती केली जात आहे
दोन दिवसांपूर्वीच जगभरातील विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांनी वर्षा निवासस्थानी येऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेत आरती केली. तसेच, या अधिकाऱ्यांच्याहस्ते येथे आरतीही करण्यात आली होती.
यात श्रीलंका, मॉरिशस, स्वीडन, स्वित्झर्लंड, यूएई, अमेरिका, येमेन, दक्षिण कोरिया, चिली, चायना, मेक्सिको, जर्मनी, इंडोनेशिया, इराक, इराण, आयर्लंड, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बहारिन, बेलारूस या देशांच्या भारतीय राजदूतांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: सर्व देशांच्या राजदूतांचे उपस्थित राहून आगत्याने स्वागत केले. तसेच त्यांना खास भेट देऊन सन्मानीतही केले. या पाहुण्यांसाठी खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती.
विविध देशांच्या या राजदूतांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेतला. तसेच श्री गणरायाचा आवडता नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकांचा आस्वादही घेतला.
विदेशी पाहुणेही गणरायाच्या भक्तीभावात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. जय देव जय देव जय मंगलमूर्ती... गुनगुणनत हे पाहुणे बाप्पांची आरती करताना भारतीय संस्कृती व परंपरेत लीन झाले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दररोज सकाळी आणि सायंकाळी गणपती बाप्पांची आरती केली जाते. त्यासाठी, अनेक मान्यवरांना बोलवण्यात येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दररोज सकाळी आणि सायंकाळी गणपती बाप्पांची आरती केली जाते. त्यासाठी, अनेक मान्यवरांना बोलवण्यात येते.