G20 Summit: गाला डिनरला परदेशी पाहुण्यांची हटके स्टाईलमध्ये एन्ट्री; पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिनरसाठी काळ्या रंगाच्या फॉर्मल जॅकेटऐवजी आरामदायी व्ही-नेक स्ट्रीप जॅकेट परिधान केलं होतं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोत्यांचा हार असलेली साडी परिधान करून डिनरला हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि त्यांच्या पत्नी कोबिता जगन्नाथ यांच्यासह पारंपारिक पोशाखात दिल्लीतील भारत मंडपममध्ये डिनरसाठी हजेरी लावली.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीही डिनरला हजेरी लावली. अक्षताने बहुरंगी ड्रेस परिधान केला होता.
अक्षती मूर्तीने ऋषी सुनक यांच्यासोबत पंतप्रधान मोदींना नमस्कार करुन वंदन केलं.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी रॉयल ब्लू टायसह काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, तर त्यांची पत्नी युको किशिदा साडी नेसून डिनरला पोहोचली होती.
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज राखाडी रंगाच्या सूटमध्ये आणि त्यांची जोडीदार जोडी हेडन टर्टलनेक निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये डिनरला उपस्थित होते.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो आणि त्यांची पत्नी इरियाना जोको विडोडो हे देखील फॅन्सी स्टाईलमध्ये पोहोचले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या डिनरला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या MD क्रिस्टालिना जॉर्जिवा भारतीय सूटमध्ये दिसल्या, त्या सलवार सूट घालून आल्या होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदींनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचं देखील स्वागत केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिपब्लिक कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल आणि त्यांच्या पत्नीचं देखील स्वागत केलं.