G20 Summit India : चांद्रयान-3, नटराज, तिरंगी रंगांची रोषणाई... G-20 परिषदेसाठी दिल्ली सजली
G-20 मध्ये सहभागी होणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्ली सज्ज आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख ठिकाणं रंगीबेरंगी रोषणाईनं उजळून निघाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविमानतळासह राजधानीचे रस्ते G-20 लोगो आणि रोषणाने सजवण्यात आले आहेत, रात्रीच्या वेळी हे दृश्य अप्रतिम दिसते.
रस्तेच नाही तर इमारतींनाही तिरंगी सजावट करण्यात आली आहे.
परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नवी दिल्ली विमानतळ पूर्णपणे सज्ज आहे. ठिकठिकाणी तिरंगी रोषणाई करण्यात आली आहेत. संपूर्ण दिल्ली जणू तिरंही रंगात न्हाऊन निघाली आहे.
याशिवाय दिल्लीत अनेक ठिकाणी झेंडे फडकवण्यात आले आहेत.
जगातील टॉप 20 राष्ट्रांचे फडकणारे ध्वज एकत्र ठेवण्यात आले आहेत.
image 5
जी-20 परिषद ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांची सजवण्यात आली आहे. तिथे विविध रंगांचा लाईट शो देखील आहे.
दिल्लीतील रस्त्यांपासून ते इमारतींपर्यंत सजावट करण्यात आली आहे. G20 शिखर परिषद ITPO कन्व्हेन्शन सेंटर, प्रगती मैदान येथील 'भारत मंडपम' येथे होणार आहे.
आयटीपीओ कन्व्हेन्शन सेंटरला खास सजावट करण्यात आली आहे. भारत मंडपममध्ये नटराजाची मूर्ती बसवण्यात आली असून त्यावरही लाईटींग करण्यात आली आहे.
चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताने जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जी-20 च्या पार्श्वभूमीवर चांद्रयान-3 चं चित्र देखील भिंतींवर रेखाटण्यात आलं आहे.
दिल्लीत ठिकठिकाणी भिंतींवर तिरंग्यांचे चित्र रेखाटण्यात आलं आहे.
आयटीओमधील एक इमारत तिरंगी रंगांनी सजवण्यात आली होती. परदेशी पाहुण्यांचे आगमन आणि त्यांची सुरक्षा पाहता सर्व यंत्रणा सतर्क असून दिल्लीत अतिशय चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
रस्त्यालगतची सर्व उद्याने सुशोभित करण्यात आली आहेत. या उद्यानांमध्ये भारताची ओळख दाखवणारे पुतळेही बसवण्यात आले आहेत.