New Delhi: तुम्ही G-20 चं नाव बर्‍याच दिवसांपासून ऐकलं असेल; पण तुम्हाला त्यातील G चा अर्थ माहीत आहे का?

G-20 Name Full Form: नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबरला G-20 परिषद आयोजित करण्यात आली आहे. ज्याची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्याचं नावही तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल.

G-20

1/11
तुम्ही G-20 तील देशांबद्दल किंवा त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांबद्दल बरंच ऐकलं असेल. पण G-20 संघटनेच्या नावातील G म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहीत आहे का?
2/11
नवी दिल्लीत होणारी G-20 परिषद नुकत्याच बांधलेल्या भारत मंडपममध्ये होणार आहे.
3/11
दरवर्षी या देशांचे राष्ट्रप्रमुख एकाच ठिकाणी भेटतात आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात. पूर्वी केवळ सर्व देशांचे अर्थमंत्री यात सहभागी होत असत, मात्र आता अनेक स्तरावरील नेते यात सहभागी होतात.
4/11
G20 ची पहिली बैठक 2008 मध्ये वॉशिंग्टन, USA येथे झाली आणि दरवर्षी परिषद आयोजित केली जाते.
5/11
ही संघटना महत्त्वाची आहे, कारण या संघटनेचा भाग असलेल्या सर्व देशांचा जागतिक जीडीपी, व्यापार इत्यादींमध्ये महत्त्वपूर्ण वाटा आहे.
6/11
G-20 मधील G बद्दल बोलायचं झालं तर तर बरेच लोक G म्हणजे ग्लोबल (Global) असं समजतात, परंतु तसं नाही. G चा अर्थ ग्रुप (Group) असा होतो.
7/11
G-20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी (Group of 20) म्हटलं जातं.
8/11
या संघटनेमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया रिपब्लिक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युरोपियन युनियन आणि युनायटेड स्टेट्स या देशांचा समावेश होतो.
9/11
जी-20 निमित्त प्रमुख शहरांत रंगरंगोटी करण्यात आली आहे.
10/11
नवी दिल्लीतील भिंतींवर देखील आकर्षक चित्र काढण्यात आले आहेत.
11/11
नागरिकांनीही उत्साहाने आपली कलाकुसर दाखवायसा सुरुवात केली आहे.
Sponsored Links by Taboola