RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत रघुराम राजन यात्रेत सहभागी झाल्याचे दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानमधील सवाई माधोपुर येथील भदौती इथे रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. यात्रेतील त्यांच्या सहभागानंतर विविध चर्चांना उधाण आले आहेत.
रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे.
द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे
सध्या राहुल गांधा यांची भारत जोडो यात्रा ही राजस्थानमध्ये आली आहे. राजस्थानमधील भदौती इथे रघुराम राजन आज राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले होते.
काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतू तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नसल्याचे राजन म्हणाले होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नागरिक यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत.
रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे (RBI) 23 वे गव्हर्नर होते. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात 2013 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात 2016 पर्यंत रघुराम राजन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. यानंतर उर्जित पटेल हे आरबीआयचे गव्हर्नर झाले.
रघुराम राजन यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक आणि आयआयएम अहमदाबादमधून व्यवस्थापन पदवी आणि एमआयटीमधून पीएच.डी. केली आहे.