PHOTO: संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला 21 वर्षे पूर्ण, जाणून घ्या काय होता पाकिस्तानी दहशतवाद्यांचा प्लॅन
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. 13 डिसेंबर 2001 या दिवशी संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ला केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहशतवाद्यांनी संसदेवर केलेल्या या हल्ल्यावेळी संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार होते.
हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीच तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसदेच्या बाहेर पडल्या होत्या. परंतु उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजप नेते प्रमोद महाजन सेंट्रल हॉल आणि परिसरात होते.
या सर्वांना तात्काळ संसदेतील एका गुप्तस्थळी नेण्यात आले. दरम्यान, संसदेवर हल्ला करून सर्व खासदार आणि मंत्र्यांना ओलीस ठेवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. परंतु जवानांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा हा कट फसला होता.
त्यावेळी संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होतं. संसदेवर हल्ला करणारे पाच दहशतवादी पांढऱ्या रंगाच्या अॅंम्बेसिडरमधून आले होते. त्यांनी संसदेच्या आवारातील सुरक्षा दलांवर अचानक फायरिंग सुरु केली.
सुरक्षा दलांनी त्या पाचही दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यात दिल्ली पोलीसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले.
या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी 6 डिसेंबर 2002 ला मोहम्मद अफजल गुरू, शौकत हुसैन, अफसान आणि सय्यद अब्दुल रहमान गिलानी यांना अटक करण्यात आली होती.
या हल्ल्याचा प्रमुख आरोपी मोहम्मद अफजल गुरू याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अफजल गुरू याला 9 फेब्रुवारी 2013 ला दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी दिली होती.
आज या हल्ल्याला 21 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसद परिसरात शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
देशभरातही विविध ठिकाणी या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (सर्व फोटो PTI)