Flood in India : देशात 'जलप्रलय', दिल्लीसह उत्तर भारतात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत
हिमाचल प्रदेशात पावसानंतर आलेल्या पुरामुळे देशात सर्वाधिक विध्वंस झाला आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिमाचलच्या बियास नदीला आलेल्या पुरानंतर राज्यात आतापर्यंत 88 जणांचा मृत्यू झाला आहे. (PC:PTI)
हरियाणाच्या यमुनेमध्ये 100 क्युसेक पाणी सोडल्यामुळे दिल्लीचा सखल भाग जलमय झाला आहे. (PC:PTI)
पंजाब आणि हरियाणामध्येही पुरामुळे 21 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. (PC:PTI)
हिमाचलच्या कासोलमध्ये सुमारे 2000 पर्यटक अडकल्याची माहिती आहे, त्यापैकी 40 परदेशी आहेत. (PC:PTI)
संपूर्ण उत्तर भारत पावसाच्या तडाख्यात आहे आणि त्यामुळे आलेल्या पूरस्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. (PC:PTI)
उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक घरांमध्ये पुन्हा तडे दिसायला लागले असून जमीनही खचली आहे. (PC:PTI)
दिल्लीतील पुराचा धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून यमुनेजवळील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (PC:PTI)
शुक्रवारी सकाळी यमुनेच्या पाण्याची पातळी 208.46 इतकी नोंदवण्यात आली, त्यामुळे राजधानी दिल्लीत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. (PC:PTI)