Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता पाण्यावरही धावणार मेट्रो.. देशातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 एप्रिलला केरळमध्ये देशातल्या पहिल्या पाण्यावरील मेट्रोचे उद्घाटन करतील
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही मेट्रो इतर मेट्रोपेक्षा फार वेगळी आहे. ही मेट्रो ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावणार आहे. याचे उद्घाटन केरळमधील कोचीमध्ये होईल.
बंदरगाह शहरात 1,136 कोटी रुपये खर्च करून ही मेट्रो तयार करण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना या मेट्रोला राज्याचे 'ड्रिम प्रोजेक्ट' म्हटले आहे.
पाण्यावरील मेट्रोचा हा मार्ग 78 किलोमीटरचा आहे ज्यामध्ये 15 स्थानकं आहेत. ही संकल्पना आधुनिक, पर्यावरण पूरक तसेच प्रवाशांना सुखद अनुभव देणारी असेल.
प्रवासी कोची 1 कार्डाचा वापर करून कोची मेट्रो आणि वॉटर मेट्रो या दोन्हीमध्ये प्रवास करू शकतील. डिजिटल स्वरुपात देखील याचे तिकीट काढता येईल.
कोची हे केरळमधील दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील दाट लोकवस्तीच्या शहरात गर्दी कमी करण्यासाठी आणि कोचीच्या किनाऱ्यावर सहज पोहचण्यासाठी वाहतुकीची ही नवी संकल्पना साकार करण्यात आली आहे. कोची वॉटर मेट्रोमुळे एक लाखापेक्षा जास्त लोकांना फायदा होण्यास मदत होईल.