Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Famous Places of Jammu-Kashmir : निसर्गसौंदर्याने नटलेल्या काश्मीरमधील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या!
जम्मू-काश्मीरचे प्रसिद्ध पिकनिक स्पॉट्स: काश्मीरला भारताचे नंदनवन म्हटले जाते. इथलं सौंदर्य देशालाच नाही तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतं. बर्फाने आच्छादलेले पर्वत आणि झाडांनी वेढलेल्या दऱ्या पाहून कोणालाही फोटो क्लिक करण्याचा मोह टाळता येणार नाही. जाणून घेऊया जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट्सबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेताब व्हॅली - काश्मीरच्या बेताब खोऱ्यातील हवामान वर्षभर आल्हाददायक असते. उन्हाळ्यात येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इथे आल्यावर निसर्गाचे खरे सौंदर्य बघता येते.
सोनमर्ग - हे काश्मीरचे प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणचे सौंदर्य देखील पर्यटकांना खूप आकर्षित करते. हे हिल स्टेशन पाईन वृक्षांनी वेढलेलं आहे.
शालीमार बाग - शालीमार बाग हे काश्मीर खोऱ्यातील सर्वात मोठे मुघल उद्यान आहे. याला 'हाऊस ऑफ लव्ह' असेही म्हणतात. या बागेची रचना पर्शियन 'चार बाग' वर आधारित आहे. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे 'चिनी खानास', जो रात्री तेलाच्या दिव्यांनी उजळला जातो.
गुलमर्ग - गुलमर्ग हे जम्मू-काश्मीरमधील एक सुंदर हिल स्टेशन आहे. याला फुलांची भूमी असेही म्हणतात. आज ते हिरवेगार आणि सौम्य वातावरणामुळे पिकनिक आणि कॅम्पिंग स्पॉट बनलं आहे.
दल सरोवर - हे काश्मीरमधील दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे. जे 26 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले आहे. शिकारा म्हणजेच लाकडी बोट आणि हाऊस बोटमध्ये फिरायला पर्यटक येतात. यासोबतच इथे स्विमिंग, वॉटर सर्फिंग, कायाकिंग, अँलिंग आणि कॅनोईंग यांसारख्या स्पोर्ट्स राईडचा आनंद घेऊ शकता.