Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर बुल्डोझर
दिल्ली पालिकेच्या कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर कारवाई सुरुच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे.
अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरी येथे तोडक कारवाई स्थगित करण्याच्या आदेशानंतरही पुन्हा सुरू असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला तात्काळ थांबवण्यास सांगितलं आहे.
याचिकाकर्ते दुष्यंत दवे यांनी सांगितलं की, सरन्यायाधीशांना कारवाई अद्याप सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना माहिती देण्यास सांगितलं. आदेशाची प्रत पालिका आणि पोलीस आयुक्तांना देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.