Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार,तंबाखूमुळे भारताच्या जीडीपीचे नुकसान
डब्ल्यूएचओच्या अभ्यासानुसार, दरवर्षी भारताला तंबाखूमुळे होणारे आजार, आणि अकाली मृत्यू यांमुळे जीडीपीच्या 1 टक्क्यांहून अधिक नुकसान सहन करावे लागते. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचा अर्थ तंबाखूपासून सरकारला जितका पैसा मिळतो त्यापेक्षा जास्त पैसा उपचार आणि जनजागृती मोहिमांवर खर्च होतो.(Photo Credit : unsplash)
अभ्यासात असे म्हटले आहे की 2017 ते 2018 दरम्यान, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये तंबाखूमुळे होणारे सर्व रोग आणि मृत्यू यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचे 27.5 अब्ज किंवा 1.77 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (Photo Credit : unsplash)
याचा अर्थ प्रत्येक 100 रुपयांच्या करामागे तंबाखूमुळे अर्थव्यवस्थेचे 816 रुपयांचे नुकसान होते(Photo Credit : PTI)
तंबाखूच्या आर्थिक ओझ्यांपैकी 74 टक्के धूम्रपानामुळे आणि 26 टक्के तंबाखू चघळल्याने होतो.(Photo Credit : PTI)
तंबाखूशी संबंधित एकूण आर्थिक भारांपैकी 91 टक्के भार पुरुष सहन करतात(Photo Credit : PTI)
तर उर्वरित 9 टक्के स्त्रिया सहन करतात. भारतातील WHO प्रतिनिधी डॉ. रॉडेरिको एच. ऑफ्रिन यांच्या मते, भारतात 2011-2018 मध्ये तंबाखूच्या वापरामुळे आरोग्य सेवा खर्चात वाढ झाली आहे. (Photo Credit : unsplash)
याचा अर्थ सरकारला आरोग्यावर जास्त पैसा खर्च करावा लागतो. तंबाखू नियंत्रणासाठी भारताने कठोर पावले उचलली तर लाखो जीव वाचू शकतात.(Photo Credit : unsplash)
तसेच तंबाखूचे समाजावर आणि अर्थव्यवस्थेवर होणारे वाईट परिणाम कमी होऊ शकतात.(Photo Credit : unsplash)