Pune News : तब्बल 18 तास, अग्निशमन दलाचे जवान; अखेर वडगाव शेरी चौकात पलटी झालेला टँकर रस्त्य्याच्या बाजूला
नगर महामार्गावरील वडगाव शेरी चौकाजवळ रविवारी मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास टँकर पलटी झाला होता. यामध्ये झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल 18 तासानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला आहे. वायुगळीमुळे होणारी मोठी दुर्घटना टळल्यानंतर जणू कालची राञ वैरयाची होती, अशी प्रतिक्रिया अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रविवारी मध्यरात्री अग्निशमन दल नियंत्रण कक्षात नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकालगत एक गॅस असलेला टँकर पलटी झाला असून मोठ्या प्रमाणात वायुगळती होत असल्याचा फोन आला होता.
त्याचवेळी घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे अग्निशमन दलाकडून मदत घटनास्थळी रवाना करण्यात आली. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, मोठ्या प्रमाणात अपघातग्रस्त टँकरमधून वायूगळती होत होती.
त्याचवेळी माहिती घेतली असता सदर वायु हा इथिलीन ऑक्साइड असल्याचे समजताच हा वायू ज्वलनशील व धोकादायक असून हा पाण्यात विरघळणारा असल्याने समजले. त्यानंतर यावर सेकंदाचा ही विलंब न करता पाण्याचा फवारा करत टँकरवर आग वा स्फोट होऊ नये, म्हणून सातत्याने चारही बाजूने पाणी मारण्याचे कार्य जवानांनी सुरू केले.
वडगाव शेरी चौकालगत टँकर पलटी होऊन वायुगळती झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतुक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क रहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहान पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेय.
रहदारीच्या ठिकाणी टँकर पलटी झाला होता. पुणे अहमदनगर रोडवरील वडगाव शेरी चौकात दिवसरात्र रहदारी असते. येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे वास्तव्य आहे.
त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाच्या विविध पथकांनी घटनास्थळी जाऊन नियंत्रण केले.