Kashmir Cold Wave: काश्मीरमध्ये थंडीची लाट, श्रीनगरमध्ये तापमान शून्याच्या खाली; पाहा फोटो
त्यामुळे सोमवारी 20 नोव्हेंबर रोजी दाट धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतापमानात घट झाल्याने काश्मीरमध्ये थंडीची लाट सुरू झाली आहे. भारतीय हवामान विभागाने या संदर्भात माहिती दिली.
आयएमडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे 0.8 अंश सेल्सिअस होते.
जे वर्षाच्या या हंगामात सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंश सेल्सिअस कमी आहे.
आयएमडीनुसार, शहराच्या कमाल तापमानातही घट दिसून आली. रविवारी शहराचे कमाल तापमान 12.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
हवामान खात्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील शोपियानमध्ये किमान तापमान उणे 3.8 अंश सेल्सिअस आणि पहलगाममध्ये किमान तापमान उणे 2.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
त्याच वेळी, उत्तर काश्मीरच्या बांदीपोरामध्ये किमान तापमान उणे 2.5 अंश सेल्सिअस आणि गुलमर्गचे तापमान उणे 1.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
श्रीनगर शहर पहाटे दाट धुक्याने व्यापले होते, त्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
येत्या 48 तासांत संपूर्ण खोऱ्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.