Delhi-Mumbai Expressway: मुंबईहून फक्त 12 तासात आता गाठता येणार दिल्ली, पंतप्रधान मोदी करणार दिल्ली-मुंबई महामार्गाचं उद्घाटन
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा पहिला टप्पा तयार झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी या महामार्गाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता, त्यानंतर या महामार्गाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी (12 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) या महामार्गाचं उद्घाटन करणार आहेत.
केंद्र सरकारच्या (central government) मुख्य प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या दिल्ली मुंबई-एक्स्प्रेस वेच्या (Delhi-Mumbai Expressway) पहिल्या टप्प्याचे (246 किमी) काम पूर्ण झाले आहे, ज्यासाठी सुमारे 12,150 कोटी रुपये खर्च आला आहे.
पूर्ण झाल्यानंतर हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे (Delhi-Mumbai Expressway) असेल. ज्याची लांबी 1,386 किमी असेल.
हे काम पूर्णपणे तयार झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई (Mumbai) हे अंतर 1,242 किमी होईल, जे आता 1424 किमी आहे.
तसेच प्रवासाचा वेळ देखील 24 तासांवरून 12 तासांपर्यंत कमी होईल, म्हणजेच हा वेळ जवळजवळ निम्मा होईल.
सध्या हा द्रुतगती मार्ग 8 लेनमध्ये तयार करण्यात येत असून भविष्यात 12 लेनचा बनवला जाऊ शकतो.
जनावरांना रस्ता ओलांडण्यासाठी या एक्स्प्रेस वेमध्ये (Delhi-Mumbai Expressway) अॅनिमल पास बनवले जाणार आहेत, जेणेकरून जनावरांमुळे होणारे अपघात टाळता येतील.