Flood : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, आजही पावसाचा इशारा
सध्या उत्तर भारतात पावसानं (Rain) कहर केला आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लातही (Delhi) अशीचं स्थिती आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या दिल्लीत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
दिल्लीत पावसामुळे यमुना नदीच्या (Yamuna River) पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. तब्बल 45 वर्षांनंतर येथील नदीच्या पाणी पातळीने 208 मीटरचा टप्पा ओलांडला आहे.
दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी स्थिर झाली आहे. ती आज रात्रीपासून कमी होण्यास सुरुवात होईल.
यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीसह सार्वजनिक आणि खासगी पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे.
दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये रविवारपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.