BRO Project: लडाखमध्ये तयार होणार जगातलं सर्वात उंच उंच फायटर एअरफिल्ड, राजनाथ सिंह यांनी केला शिलान्यास
या योजनेचा शिलान्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळवार 12 सप्टेंबर रोजी जम्मूमधील देवक पुलापासून याची सुरुवात करण्यात आली.
सध्या एलएसीवर सुरु असलेल्या चीनसोबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे.
चीनला चोख उत्तर देण्यासाठी या एअरफिल्डची रचना करणे हे भारताकडून उचलण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
मागील तीन वर्षांपासून पूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लँडिंग मैदानाचा वापर भारतीय सैन्याकडून केला जात आहे.
वाहतूकीसाठी आणि युद्धाच्या सामग्रीची ने- आण करण्यासाठी या मैदानाचा वापर भारताकडून केला जात आहे.
2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.