Cyclone Michaung चा कहर; आज लँडफॉल, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, पाहा फोटो
Cyclone Machaung Update: दक्षिण बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्याचं 'चक्रीवादळात रूपांतर झालं. ज्याला 'मिचॉन्ग' चक्रीवादळ असं नाव देण्यात आलं. आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान आज म्हणजेच, मंगळवारी हे चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) यासंदर्भात माहिती दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिचॉन्ग चक्रीवादळाचा कहर देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये होताना दिसत आहे. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे घडलेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. भुयारी मार्ग आणि रस्ते बंद करण्यात आलेत.
मुख्यमंत्री एमके स्टॅलिन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, त्यांनी मदत छावण्यांची पाहाणीदेखील केली आहे. विमानतळावरही पाणी साचल्यानं विमानसेवाही खंडीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक उड्डाणं रद्द केली आहेत. एवढंच नाहीतर रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचल्यानं रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.
हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वादळाचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं असून मंगळवारी सकाळी ते दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
सोमवारी (4 डिसेंबर), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत मिचॉन्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा केली. परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतीचं आश्वासनही त्यांनी दिलं.
दक्षिणेकडील राज्यांत धुमाकूळ घालणारं मिचॉन्ग चक्रीवादळ आज नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
तीव्र चक्रीवादळ 'मिचॉन्ग' चेन्नईच्या सुमारे 100 किमी ईशान्येस आणि नेल्लोरच्या 120 किमी आग्नेयेला दक्षिण बंगालच्या उपसागरात आज 2:30 वाजता मध्यवर्ती आहे. ते हळूहळू तीव्र होऊन उत्तरेकडे सरकून एक तीव्र चक्रीवादळ बनेल. चक्रीवादळ म्हणून , ते 5 डिसेंबरच्या दुपारी बापटलाजवळ नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडेल., अशी माहिती आयएमडीनं ट्विटरवर दिली आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने मंगळवारी चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट अंतर्गत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू या चार जिल्ह्यांतील सार्वजनिक उपक्रम आणि कॉर्पोरेशन, बोर्ड, बँका आणि वित्तीय संस्थांच्या कार्यालयांसह सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालये राज्यातील प्रतिकूल हवामानामुळे बंद राहतील.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
image 10
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.