Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Updates : धोका कायम! देशात 170 नवे रुग्ण, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू
कोरोनाचा वाढता धोका पाहता भारतात खबरदारीची पाऊले उचलण्यात येत असून देशव्यापी लसीकरण मोहिमेमुळे भारतात 220 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. (PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात आज 170 नवी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (PC : istockphoto)
रविवारी देशात 163 रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने आज देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 7 रुग्णांची किंचित वाढ झाली आहे. (PC : istockphoto)
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोट्यवधी जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. (PC : istockphoto)
देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून अनेक जणांनी या संक्रमणावर मात केली आहे. (PC : istockphoto)
गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा रुग्ण मध्य प्रदेशातील होता. (PC : istockphoto)
देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 46 लाख 80 हजार 094 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत (PC : istockphoto)
देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 721 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (PC : istockphoto)
भारतात कोरोनाचा धोका सध्या कमी असला तरी, केंद्र सरकारकडून खबरदारीची पाऊले उचलण्यात येत आहेत. (PC : istockphoto)
आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण करण्याचे आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. (PC : istockphoto)
आतापर्यंत देशात 220 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. (PC : istockphoto)
भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. (PC : istockphoto)