Ganga Vilas Cruise : भारतात सुरू होणार जगातील सर्वात मोठं रिव्हर क्रूझ; पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
Ganga Vilas River Cruise: भारतातील क्रूझ पर्यटनाला (Cruise Tourist) चांगली सुरुवात होणार आहे. भारतात लवकरच नदीतील सर्वात मोठं क्रूझचा प्रवास सुरू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे, हे क्रूझ नदीत चालणारं जगातील सर्वात मोठं क्रूझ असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शुक्रवारी (13 जानेवारी, 2023) वाराणसीमध्ये या क्रूझला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'एमव्ही गंगा विलास' हे नदीवरील क्रूझ शुक्रवारी वाराणसीहून आपल्या पहिल्या प्रवासाला मार्गस्थ होणार आहे.
या क्रूझचा प्रवास 13 जानेवारी 2023 रोजी वाराणसीपासून सुरू होईल आणि 1 मार्च रोजी हे क्रूझ दिब्रुगडला पोहोचण्याची शक्यता आहे. वाराणसीतील गंगा नदीवर प्रसिद्ध गंगा आरती करून ही क्रूझ आपल्या प्रवासाला सुरुवात करेल.
लग्झरी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या क्रूझमध्ये 18 आलिशान खोल्या आहेत. क्रूझवर एक आलिशान रेस्टॉरंट्स, स्पा आणि सनडेक देखील आहे. क्रूझच्या मुख्य डेकवर 40 जणांसाठी आसनव्यवस्था असलेलं रेस्टॉरंट आहे. या रेस्टरंट्समध्ये कॉन्टिनेंटल आणि भारतीय पाककृतींसह काही बुफे काउंटर आहेत. वरच्या डेकच्या आऊटडोअर सीटिंगमध्ये रिअल टीक स्टीमर खुर्च्या आणि कॉफी टेबलही आहेत.
यामुळे प्रवाशांना नदीतून प्रवास करण्याचा सुखद अनुभव घेता येणार आहे. यात शॉवरसह बाथरूम्स आहे. कन्वर्टेबल बेड्स, फ्रेंच बाल्कनी, एलईडी टीव्ही, तिजोरी, स्मोक अलार्म्स, लाईफ वेस्ट आणि स्प्रिंकलर्स यांचा समावेश आहे.
या प्रवासात ते प्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र सारनाथ, मायोंग आणि नदीत असलेल्या बेटांपैकी प्रसिद्ध असलेल्या माजुली या बेटालाही भेट देणार आहे. क्रूझच्या या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटकही सहभागी होणार आहेत.
केंद्रीय बंदरं, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी माहिती दिली आहे की, MV गंगा विलासच्या उद्घाटनामुळे भारत नदीवरील क्रूझ प्रवासाच्या जागतिक नकाशाचा एक भाग बनेल.
मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, यामुळे देशातील नदी पर्यटनाच्या क्षेत्रात अफाट शक्यतांची दारं खुली होतील. सध्या देशात वाराणसी आणि कोलकाता दरम्यान 8 रिव्हर क्रूझ कार्यरत आहेत. याशिवाय दुसऱ्या राष्ट्रीय जलमार्गावर (ब्रह्मपुत्रा नदी) क्रूझ वाहतूक सुरू असते.