Coronavirus Updates : चीनमध्ये लॉकडाऊनची भिती; भारतात कोरोनाची स्थिती काय?
जगभरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. मात्र, भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा वेग कमी झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशात गेल्या 24 तासांत 215 नवीन कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळले आहेत. काल ही संख्या 293 इतकी होती.
एप्रिल 2020 पासून सर्वात कमी कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी तसेच भारतासाठी ही सकारात्मक बाब आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ही कोविड-19 ची संख्या 4,46,72,068 वर पोहोचली आहे.
ज्याप्रमाणे कोरोना रूग्णांची संख्या कमी होतेय. त्याचप्रमाणे कोरोनामुळे एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा रिकव्हरी रेट 98.3 टक्के आहे. मुंबईत सध्या 95 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. नोव्हेंबरमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली घसरली आहे.
एकीकडे भारतात कोरोनाचा वेग मंदावला असताना जगभरात मात्र परिस्थिती वेगळी आहे. जगात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होतेय.
जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोकं वर काढताना दिसत आहे. चीन, जपान, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याचं दिसत आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासनाने अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केला आहे. मात्र जनतेकडून लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे.