Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी चालवली बुलेट, पाहा फोटो
कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा आज 81 व्या दिवशी इंदूरमध्ये पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदूरमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी येथे बुलेट बाईक चालवताना दिसले.
येथे राहुल गांधी यांनी सभा देखील घेतली. या सभेत ते म्हणाले आहेत की, आम्ही या प्रवासाला एकटे नाही, तर संपूर्ण भारत आमच्यासोबत आहे. संपूर्ण देशातील जनता आमच्यासोबत चालत आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मी इंदूर आणि इंदूरच्या जनतेचे अभिनंदन करतो. तुम्हाला 6 वेळा स्वच्छता पुरस्कार मिळाला आहे. तुम्ही मला बंधुभाव शिकवला आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, या रस्त्यांवर हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि सर्वजण एकत्र चालत होते. हा प्रवास एक प्रकारे भारताच्या विचारधारेचा प्रवास आहे.
लोकसभेत आमचा आवाज ऐकला जात नाही, हे भारत जोडो यात्रेचे मुख्य कारण असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
ते म्हणाले की, आम्ही लोकसभेत अनेकदा मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा अन्य विषयांवर चर्चा झाली. मात्र आमचा माईक बंद केला जातो, असा आरोप त्यांनी केला.
नोटाबंदी आणि जीएसटी लागू करणे ही भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
याचा फायदा शेतकरी, मजूर, तरुण, लहान दुकानदार यांना झाला नसल्याचे ते म्हणाले.
नोटाबंदी आणि जीएसटीचा फायदा फक्त दोनच लोकांना झाला आहे, या लोकांच्या पाठीमागे हेच लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला.