IN pics: भारत जोडो यात्रेची राजधानीत एन्ट्री; लाल किल्ल्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
Bharat Jodo Yatra in Delhi: काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) आज राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली
Bharat Jodo Yatra in Delhi: 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सुरुवात झाली. या यात्रेने आतापर्यंत 9 राज्यांचा समावेश केला आहे.
लाल किल्ल्यावर राहुल गांधी यांनी भाषण केले, यावेळी त्यांनी मोदी सरकार टीकास्त्र सोडलं.
Rahul Gandhi Speech: आज काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) दिल्लीत पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणात म्हटलं की, देशात मोदींचं नाही तर अदानी अंबानींचं सरकार आहे.
राहुल गांधी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशाला माहित आहे की देशातलं हे सरकार नरेंद्र मोदींचे सरकार नाही, हे अंबानी अदानींचे सरकार आहे.
मी 2,800 किमी चाललो, मला कुठेही द्वेष किंवा हिंसाचार दिसला नाही, परंतु जेव्हा मी न्यूज चॅनेल उघडतो तेव्हा मला नेहमीच द्वेष-हिंसा दिसते, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. मी एक शब्दही बोललो नाही कारण मला त्यांच्याकडे किती शक्ती आहे हे पहायचे होते. भाजपकडून नेहमी हिंदू धर्माबद्दल बोललं जातं, पण गरीबांना चिरडून टाका, असे हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे का? असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात सीमेवर कोणीच आले नाही, मग लष्कराने 21 टप्प्यांमध्ये चर्चा का केली? चीनने आपली 2 हजार चौरस किलोमीटर जमीन कशी बळकावली? असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, तुमच्या सेलफोन आणि शूजच्या मागे मेड इन चायना लिहिलेले दिसते. तिथं मेड इन इंडिया लिहायचे आहे. असा दिवस यावा की शांघायमध्ये बूट दिसला तर तो मेड इन इंडिया असं लिहिलेला असेल. यातून तरुणांना रोजगार मिळेल, असंही ते म्हणाले.
राहुल गांधींनी पुढं म्हटलं की, या देशाला जर कोणी रोजगार देऊ शकत असेल तर तो शेतकरी आणि छोटे व्यापारी आहेत. कारण देशात लाखोंची संख्या त्यांचीच आहे. या लोकांसाठी बँकेचे दरवाजे बंद असतात. भारतातील 2-3 अब्जाधीशांना 1 लाख कोटी, 2 लाख कोटी, 3 लाख कोटी सहज दिले जातात पण जेव्हा शेतकरी आणि छोटे व्यापारी बँकेत जातात तेव्हा त्यांना हाकलून दिले जाते.
भारत जोडो यात्रेमध्ये सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत हजेरी लावत आहेत. दिल्लीमध्ये शेकडो लोक यात्रेत सहभागी झाले.