Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा राजधानी दिल्लीत दाखल; आज लाल किल्ल्यावर धडकणार, राहुल गांधींची जाहीर सभा

आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान, काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजधानीत दाखल झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज शनिवारी (24 डिसेंबर) भारत जोडो यात्रेचा 180वा दिवस असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरू असणारी ही यात्रा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली.

दिल्ली काँग्रेसनं भारत जोडो यात्रेत सहभागी होणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मास्क घालून येण्याचे निर्देश दिले आहेत.
आज दुपारी भारत जोडो दिल्लीतील लाल किल्ल्यावर धडकणार आहे. दुपारी 4.30 वाजता ही यात्रा लाल किल्ल्यावर दाखल होईल.
लाल किल्यावर राहुल गांधींची जाहीर सभा देखील होणार आहे.
भारत जोडो यात्रेतील गर्दी पाहता वाहतूक पोलिसांनीही लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे.
अभिनेते कमल हासन या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी राजघाट आणि शांती स्थळावर जाऊन पुष्पांजली अर्पण करणार आहेत.
भारत जोडो यात्रेत सहभागी लोक दुपारी आश्रम चौकाजवळील धर्मशाळेत जेवण आणि विश्रांती घेतील. त्यानंतर ही यात्रा निजामुद्दीन, इंडिया गेट सर्कल, आयटीओ, दिल्ली कॅंट, दर्यागंज मार्गे लाल किल्ल्यावर पोहोचेल.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते राजघाट, वीरभूमी, शक्तीस्थळ आणि शांती वन येथे पोहोचून श्रद्धांजली वाहणार आहेत.
काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, काँग्रेस केंद्र सरकारनं जारी केलेल्या सर्व प्रोटोकॉलचं पालन करेल. भाजप कोविडचे राजकारण करत असून भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
(सर्व फोटो : PTI)