Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : राहुल गांधी सकाळी मदिना गावात पोहोचले आणि शेतकऱ्यांसह दोन तास शेतात राबले
कधी दिल्लीतील करोलबागमध्ये बाईकची सर्विसिंग करणारे राहुल गांधी आज शेतात भाताची लागवड करताना दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरियाणातील सोनीपतमधल्या मदिना गावात राहुल गांधी शेतात दोन तास राबले.
हरियाणातील सोनीपत इथे शनिवारी (8 जुलै) सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी अचानक थांबले. इथे त्यांनी शेतकर्यांसह शेतात भाताची लागवड केली.
तसंच ट्रॅक्टर चालवून शेतात नांगरणी देखील केली.
यावेळी त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांशी शेतीबाबत चर्चाही केली
शिवाय राहुल यांनी शेतकऱ्यांसोबत बसून नाश्ताही केला.
मदिना गावात सकाळी 6.40 च्या सुमारास ते भैंसवन-मदिना रस्त्यावरील संजय यांच्या शेतात दाखल झाले. मदिना गावात सुमारे दोन तास शेतात राबल्यानंतर राहुल गांधी सकाळी 8.40 वाजता परतीच्या वाटेला निघाले.
राहुल गांधींनी मागील महिन्यात दिल्लीतील करोलबाग येथील मोटरसायकल मेकॅनिक्सच्या कार्यशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी बाईकची सर्व्हिस देखील केली.
तर मणिपूरमध्ये हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी तिथल्या पीडित मुलांशी संवाद साधताना त्यांच्यासोबत जेवण केलं.