Elephant Spa Centre : काय सांगता? हत्तींसाठी भारतातील एकमेव स्पा सेंटर, स्क्रब आणि मसाजची खास सुविधा
भारतात प्राण्यांना खास महत्त्व देखील आहे. काही प्राणी देवाचं वाहन असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. 'गजराज' म्हणजे हत्तीला श्री गणेशाचं प्रतिक मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही आतापर्यंत माणसांच्या स्पाबद्दल ऐकलं असेल जेथे लोक थकवा दूर करण्यासाठी जातात. पण भारतात हत्तींसाठीही एक खास स्पा सेंटर आहे.
केरळमध्ये एक खास स्पा सेंटर आहे, जे खास हत्तींसाठी आहे. येथे हत्ती थकवा घालवण्यासाठी येतात.
केरळमधील गुरुवायुर (Guruvayur) शहरात हत्ती स्पा सेंटर आहे. याचं नाव 'पुन्नाथूर कोट्टा हाथी यार्ड कायाकल्प केंद्र' (Punnathoor Kotta Elephant Yard Rejuvenation Centre) असं आहे. यालाच पुन्नतूरकोट्टा हत्ती महाल असंही म्हटलं जातं.
पुन्नाथूर कोट्टा हाथी यार्ड कायाकल्प केंद्र येथे उन्हाळ्याच्या काळात जुलै महिन्यात हत्ती स्पासाठी येतात. यामध्ये हत्तींना स्पा, स्क्रब आणि मसाज करण्यास पौष्टीक आहारही दिला जातो.
या हत्ती स्पा सेंटर केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर गुरुवायुरप्पन मंदिराशी आहे. हे गुरुवायुरप्पन मंदिर पुरातन मंदिरांपैकी एक आहे.
गुरुवायुरप्पन मंदिराजवळ असलेलं पुन्नतूरकोट्टा महाल येथे आधीचे राजे वास्तव्यास होते, त्यानंतर तेथे हत्तीसाठी खास स्पा सेंटर सुरु झालं.
गुरुवायुरप्पन मंदिरात खास मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये हत्तींना विशेष महत्त्व आहे. पुन्नतूरकोट्टा महाल गुरुवायुरप्पन मंदिरापासून 3 किमी अंतरावर आहे. याआधी हत्तींना आंघोळ घालण्यासाठी या स्पा सेंटरमध्ये आणलं जातं.
प्राचीन काळात मंदिरं उभारण्यासाठी हत्तींची मदत घेतली जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हत्ती अनेक देव आणि राजे-महाराज याचं वाहनही असायचं.
त्यामुळे त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या स्पा सेंटरची सुरुवात करण्यात आल्याचं सांगितलं जातं.