Rahul Gandhi: राहुल गांधींनी भाजीविक्रेत्याला केलं जेवणासाठी आमंत्रित; त्याच्यासोबत जेवताना गप्पांदरम्यान म्हणाले...
या भेटीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजी विक्रेते रामेश्वर यांच्यात चांगलं संभाषण झाल्याचं दिसलं. राहुल गांधींनी भाजी विक्रेते रामेश्वर यांचं बरंच कौतुकही केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (१४ ऑगस्ट) एका भाजी विक्रेत्याची भेट घेतली. टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे निर्माण झालेल्या अडचणींबद्दल बोलतानाचा भाजीवाल्याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
यानंतर राहुल गांधींनी भाजी विक्रेते रामेश्वर यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत जेवणही केलं.
रामेश्वर हे दिल्लीत भाजी विकतात. टोमॅटोच्या वाढत्या किमतींबाबत एका न्यूज पोर्टलशी संवाद साधताना रामेश्वर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
भाजी विक्रेते रामेश्वर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दोघांच्या भेटीचा फोटो शेअर करत राहुल गांधी यांनी ट्विट केलं की, रामेश्वर जी एक मनमिळाऊ व्यक्ती आहेत! करोडो भारतीयांच्या जन्मजात स्वभावाची झलक त्यांच्यात दिसते. प्रतिकूल परिस्थितीतही हसतमुखाने पुढे जाणारे खऱ्या अर्थाने 'भारत भाग्य विधाता' आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील अलीकडेच (१ ऑगस्ट २०२३) दिल्लीच्या आझादपूर मंडईला भेट दिली आणि भाजीपाला-फळ विक्रेत्यांशी संवाद साधला होता.
नुकतीच राहुल गांधींनी त्यांच्या केरळच्या मतदारसंघात भेट दिली, यादरम्यानही अनेक लोकांनी त्यांची भेट घेतली.
नवी दिल्ली येथे 77व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवादरम्यान AICC मुख्यालयात राहुल गांधी उपस्थित होते. माजी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार, नेते तारिक अन्वर, अंबिका सोनी, सलमान खुर्शीद यांच्यासोबत ते उपस्थित होते.