PHOTO: मंत्री ईश्वराप्पांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; कर्नाटक विधानसभेतच आंदोलन सुरू

भविष्यात तिरंग्याची जागा हा भगवा ध्वज घेऊ शकतो, लाल किल्ल्यावर भगवा फडकू शकतो असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वराप्पा यांनी केलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ईश्वराप्पा यांच्या या वक्तव्यावरुन कर्नाटक विधानसभेत गोंधळ निर्माण झाला.

या वक्तव्यावरून ईश्वराप्पा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे आमने-सामने आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरमय्या यांनी ईश्वराप्पा यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
आमदार डॉ. अंजली निंबाळकरांनी मंत्री ईश्वराप्पा यांचे हे वक्तव्य देशद्रोही असल्याची टीका करत त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
काँग्रेसने या मुद्द्यावरुन विधानसभेत दिवस-रात्र आंदोलन सुरू केलं आहे.
जोपर्यंत ईश्वराप्पा मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत, किंवा त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं.
गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे हे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजप नेते येडियुराप्पा यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला.