उत्तर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. पुढील पाच दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
2/10
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, पुढीस पाच दिवसात थंडीचा कडाका कमी होणार आहे. हवामान विभागान याबाबतची माहिती दिली आहे.
3/10
पुढील पाच दिवस उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
4/10
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, 21 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 22 जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल.
5/10
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 23 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
6/10
20 ते 22 जानेवारीपर्यंत संपूर्ण उत्तर प्रदेशात हवामान कोरडे राहील. दुसरीकडे, 23 जानेवारी रोजी राज्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस पडू शकतो.
7/10
थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुढील पाच दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
8/10
येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळं लोकांना थंडीपासून थोडा दिलासा मिळणार आहे.
9/10
उत्तर प्रदेशात येत्या पाच दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होणार आहे. मात्र, येत्या 24 तासात त्यात कोणताही बदल दिसणार नाही.
10/10
24 आणि 25 जानेवारी रोजी राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे