Char Dham Yatra 2021 Postponed: उत्तराखंड सरकारकडून चारधाम यात्रेवर बंदी, वाचा सविस्तर
उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत उत्तराखंड सरकारने पुढील आदेश होईपर्यंत तातडीने चार धाम यात्रा स्थगित केली आहे. यासाठी सरकारने सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाचा आदेश असूनही उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केली होती.Badrinath (photo tweeted by @ANI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तराखंड उच्च न्यायालयाने जुलैपर्यंत चारधाम यात्रेवर बंदी घातली आहे. हायकोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध दर्शावत यात्रेला बंदी घातली. Badrinath (photo tweeted by @ANI)
तीर्थक्षेत्रांशी संबंधित भावना लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने सरकारला देशभरातील मंदिरांमध्ये चालू असलेल्या विधी आणि समारंभांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते.Dwarka (photo tweeted by @dhempe)
विशेष म्हणजे यात्रेदरम्यान पर्यटक आणि भाविकांसाठी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. Rameswaram (photo courtesy : railpost)
मुख्य न्यायाधीश आर एस चौहान आणि न्यायमूर्ती आलोक कुमार वर्मा यांच्या खंडपीठाने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला विरोध करत चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी जिल्ह्यातील रहिवाशांना 1 जुलैपासून हिमालयीन मंदिरांच्या दर्शनास परवानगी देण्यास स्थगिती दिली होती.Rameswaram (photo tweeted by @ProfPankajJain)
हायकोर्टाने म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत काही लोकांच्या भावनांची काळजी घेण्यापेक्षा कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लसपासून सर्वांची सुरक्षा अधिक महत्वाचे आहे. puri (photo tweeted by @SPPuri1)
याचिकाकर्त्याचे वकील दुष्यंत मैनाली यांनी सांगितले की, आता कोणालाही या प्रवासासाठी प्रत्यक्षात जाऊ दिले जाणार नाही. सुनावणीत उत्तराखंडचे मुख्य सचिव ओम प्रकाश आणि पर्यटन सचिव दिलीप जावळकर व्हर्च्युअली हजर झाले.puri (photo tweeted by @SJTA_Puri)