Chandrayaan-3 : चांद्रयान-3 उड्डाणाला 24 तास पूर्ण, चंद्राच्या कक्षेत पोहोचलं अंतराळयान, पुढील प्रवास कसा असेल?
LVM 3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत पोहोचवलं आहे. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांद्रयान-3 ने 14 जुलै रोजी यशस्वी उड्डाण केलं. यानंतर 40 दिवसांचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
आता चांद्रयान-3 चा पुढचा प्रवास कसा असेल, हे जाणून घ्या.
क्रायोजेनिक इंजिनासह चांद्रयान-3 पृथ्वीच्या बाह्य कक्षेत पोहोचलं आहे. हळूहळू चांद्रयान कक्षा आणि वेग वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.
चंद्र 100 किमीच्या कक्षेत आल्यानंतर, लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं केलं जाईल आणि त्यानंतर लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होईल. चांद्रयानमधील लँडरचं नाव 'विक्रम' आणि रोव्हरचं नाव 'प्रज्ञान' आहे.
विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल.
चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.
चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं की, जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
चांद्रयान-3 मोहिमेसाठी 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-3 प्रक्षेपणाचा खर्च सुमारे 75 कोटी आहे.