Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली; फोटोंमधून पाहा भयानक स्थिती
हरियाणातील हथिनी कुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडल्यामुळे दिल्लीतील यमुनेची पातळी सकाळी 7 वाजता 208.46 मीटर पर्यंत पोहोचली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा यमुनेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने 45 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. 1978 मध्ये यमुनेची पाण्याची पातळी 207.49 च्या आसपास मोजली गेली होती.
दिल्लीच्या रिंग रोडला पूर आला असून हे ठिकाण मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे.
पूरसदृश परिस्थिती पाहता लोकांना जुन्या दिल्लीतील निगमबोध घाटाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे, या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.
एनडीआरएफच्या सुमारे 12 पथकं लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवत आहेत.
सखल भागात पाणी साचल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय.
दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.
दिल्लीच्या यमुना बाजार, आईटीओ, राजघाट, सिव्हील लाईन, कश्मीरी गेट यांसारख्या अनेक परिसरात पाणी साचलंय.
एनडीआरएफ पथक लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलवत आहेत.
दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सखल भागात अडकलेल्या 300 जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
नोएडा जिल्हा प्रशासनाकडून लोकांना यमुनेच्या आसपास जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
दिल्लीतील अनेक परिसरातील वाहतूक खोळंबल्यानं नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.