Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत! शेवटच्या 20 मिनिटांचा थरार कसा होता? पाहा फोटो
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. (PC:PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (PC:PTI)
चांद्रयान-3 च्या लँडिंग आधीची 20 मिनिटे फार महत्त्वाची आणि आव्हानात्मक होती. (PC:PTI)
चंद्रापासून 30 किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचं पावर डिसेंट सुरु करण्यात आलं. त्यानंतर चांद्रयानाचा वेग हळूहळू कमी-कमी होत गेला आणि अखेर यान चंद्रावर लँड झालं.(PC:PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. (PC:PTI)
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचताच इस्रोमधे एकच जल्लोष पाहायला मिळाला. (PC:PTI)
इस्रोसह भारतीयांकडूनही हा अभिमानास्पद क्षण साजरा करण्यात आला. (PC:PTI)
भारतीयांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि गर्वाचा क्षण ठरला. (PC:PTI)
चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष दिसून येत होता. (PC:PTI)
इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये उपस्थित प्रत्येकाची छाती गर्वानं फुलून गेली. (PC:PTI)
चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इस्रोचं चांद्रयान-3 अखेर चंद्रावर उतरलंच. (PC:PTI)