Medicine Ban in India : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून 14 औषधांवर बंदी
डीजीसीआय (DCGI) म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने (Drugs Controller General of India) आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारने शुक्रवारी, 3 जून रोजी हा नवा निर्णय जारी केला आहे.
भारत सरकारने 14 प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDC - Fixed Dose Medicine) औषधांवर बंदी घातली आहे.
या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
त्यानंतर केंद्र सरकारने आता 14 प्रकारच्या FDC कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.
डीजीसीआय (DCGI) च्या तज्ज्ञ समितीने आधी 14 प्रकारची FDC कॉम्बिनेशन असणारी औषध मानवी आरोग्यासाठी घातक असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल उचलत या औषधांवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने शुक्रवारी 14 फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरुन बंदी घातली आहे.
फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) ही अशी औषधे, ज्यामध्ये एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात. यानांच 'कॉकटेल' (Cocktail Drug) औषधे असंही म्हटलं जातं.
केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ''तज्ज्ञ समितीने या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्षटता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या 14 FDCs औषधांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. असं सांगितलं आहे.