New Parliament: नव्या संसदेत कंगना रणौत आणि ईशा गुप्ताची एन्ट्री; म्हणाल्या, निवडणूक नक्कीच लढणार!
अनेक शानदार बॉलिवूड चित्रपट आणि 'आश्रम 2' सारख्या वेब सीरिजमध्ये आपला हॉटनेस दाखवणारी अभिनेत्री ईशा गुप्ता नुकतीच नवीन संसद भवनात पोहोचली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईशा गुप्ताने संसद भवन गाठून निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
ईशा गुप्ताने महिला आरक्षण विधेयकाला मिळालेल्या मंजुरीवरही भाष्य केलं. अभिनेत्री म्हणाली, पीएम मोदींनी केलेलं हे खूप सुंदर काम आहे, जे आपल्या देशासाठी एक मोठं पाऊल आहे.
या विधेयकामुळे महिलांमध्ये नवा उत्साह भरेल आणि त्यांना समान अधिकारही मिळतील, असंही ईशा म्हणाली.
दरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला ती निवडणूक लढवणार आहे का? असं विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री हसत हसत म्हणाली, नक्कीच, नक्कीच... होय, मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल की, ती कधी आणि कुठून निवडणूक लढवते.
अभिनयासोबतच ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
ईशा गुप्ता दररोज तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
महिला आरक्षणाचं विधेक मंजूर झाल्यावर नवीन संसदेत पोहोचलेल्या कंगना रणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झालं आहे. हा देश आणि देशातील महिलांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. नवीन संसदेचं हे पहिलंच अधिवेशन होतं आणि संपूर्ण अधिवेशन हे महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या प्रगतीसाठी समर्पित होतं.'
पंतप्रधान पद मिळाल्यापासून मोदींनी अनेक चांगली कामं केली असल्याचं अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली.
त्यामुळे येत्या काळात या दोन्ही अभिनेत्री राजकारणात सक्रिय होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.