IN Pics: स्मृती इराणींपासून सुप्रिया सुळेंपर्यंत, 10 महिला खासदारांनी खास संदेशासह जुन्या संसदेच्या आठवणी केल्या शेअर
महिला खासदारांनी स्वत:च्या हस्ताक्षरात जुन्या संसदेच्या इमारतीला निरोप दिला. यावेळी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लिहिलं की, 'या ठिकाणचा इतिहास आणि तिथल्या सुंदर वास्तुकला यांनी नेहमी जोरदार वादविवाद आणि कलह पाहिला. या संसदेने एक मजबूत राष्ट्र म्हणून आपल्या प्रवासाला आकार दिला आहे.'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन संसद भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर 10 महिला खासदारांनी जुन्या इमारतीशी संबंधित आठवणी सांगितल्या, यावेळी स्मृती इराणींनीही आठवणींना उजाळा दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला संसदेच्या सुंदर इमारतीचा भाग बनण्याची संधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र आणि बारामतीच्या जनतेचे आभार मानते.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, जुन्या संसदेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्याची आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे.
पूनम महाजन म्हणाल्या, विजयाचा शेवटचा गडगडाट करूया, पुन्हा नवा दिवा लावूया...
राज्यसभेच्या खासदार पीटी उषा यांनी लिहिलं की, मी 1986 मध्ये पहिल्यांदा संसदेला भेट दिली आणि 20 जुलै 2022 रोजी मी राज्यसभेची खासदार म्हणून पहिल्यांदा संसदेत आली, हे दिवस माझ्यासाठी मोठे होते.
खासदार रम्या हरिदास यांनी जुन्या संसदेला लोकशाहीचा राजवाडा आणि कठोर निर्णयांची जन्मभूमी म्हटलं आहे.
हरसिमरत कौर बादल यांनी लिहिलं की, या इमारतीच्या 144 खांबांशी माझ्या अनेक आठवणी निगडीत आहेत.
अनुप्रिया पटेल यांनी लिहिलं की, जेव्हा मी पहिल्यांदा संसदेच्या जुन्या इमारतीत पाऊल ठेवलं तेव्हा मला असं वाटलं की मी एखाद्या ऐतिहासिक वास्तूत पाऊल ठेवत आहे.
महुआ मोइत्रा म्हणाल्या, या जुन्या संसदेच्या इमारतीचं माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल, जसं कोणाचं तरी पहिलं घर असतं, त्याप्रमाणेच.