BJP Foundation Day : भाजपचा 44वा स्थापना दिन! 'भाजप'ची स्थापना नेमकी कशी झाली? वाचा...
भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) आज 44वा स्थापना दिवस. 1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची (BJP) सुरुवात झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती.
स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे.
सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केलं
तर आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केलं
भाजपचे सरचिटणीस तरुण चुघ (Tarun Chugh) म्हणाले की, आपल्या स्थापना दिनानिमित्त पक्षानं 6 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल या कालावधीत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सप्ताह पाळण्याचा निर्णय घेतला आहे
1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं.
1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं.
अटल-अडवाणी जोडीनं भाजपला 16 वर्षांनी देशात सत्तेवर आणलं. 1996 मध्ये पहिल्यांदा केंद्रात 13 दिवस अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, बहुमताअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला.