Bengaluru Saree Run: साडी आणि शुज! बंगळुरुमध्ये महिलांचा रविवार विशेष 'साडी रन'; फोटोंमधून पाहा हटके देसी अंदाज
बंगळुरूमधील महिलांनी फिटनेसचा स्टिरियोटाईप मोडून काढत चक्क साडी आणि स्निकर्स (Shoes) घालून साडी रन मॅरेथॉनमध्ये भाग घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपारंपरिक साऊथ इंजियन लुकमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि नारी शक्तिचं दर्शन घडवलं. केसात गजरा, हातात बांगड्या, पायात शुज आणि गॉगल लावून त्यांनी 'वुमन पॉवर' दाखवली.
शेकडो महिलांनी साडी परिधान करून रनमध्ये भाग घेतला.
महिलांनी विविध पॅटर्नच्या आणि विविध रंगी साड्या परिधान करुन या 'साडी रन' मध्ये भाग घेतला.
या रनमध्ये सहभागी झालेल्या गर्ल्स गँगचा स्वॅग वाखाणण्याजोगा होता.
त्यांनी साड्यांवर टिपिकल चप्पल किंवा सँडल न घालता हटके शुज घातले होते. महिलांच्या या इंडो-वेस्टर्न लुकने साऱ्यांचंच लक्ष वेधलं.
मुलींनी आपल्या देसी स्वॅगला थोडा वेस्टर्न तडका दिला. त्यांचा हा सुपरकूल लुक पाहून सारेच अचंबित झाले.
महिलांच्या या अनोख्या साडी रन मॅरेथॉनच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
बंगळुरुच्या रस्त्यावर आज नारी शक्तिचं दर्शन घडलं.
साडीमध्येही कसा फिटनेस राखता येतो, हे या सर्व महिलांनी दाखवून दिलं.
याआधीही कर्नाटकात अशी बाईक रॅली निघाली होती.
तर पुण्यातही मध्यंतरी महिलांसाठी साडी रन आयोजित करण्यात आला होता.