Tamil Nadu : मदुराईमध्ये रेल्वेला भीषण आग, पाहा फोटो
तामिळनाडूच्या (Tamil Nadu) मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वेला लागलेल्या आगीत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्यामुळं नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आगीची भीषणता दृष्यांमधून आपल्याला दिसत आहे.
या आगीत 25 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
गेल्या काही दिवसातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वेचा अपघात आहे. अलिकडेच म्हणजे 2 जून 2023) ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण देशाला हेलावून टाकलं होतं.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे.
काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेऊन रेल्वे डब्यात प्रवेश केला होता. या सिलेंडरमुळेचं ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्याला भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत.
आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील झाले. यानंतर तात्काळ अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते.
अथक प्रयत्नानंतर रेल्वेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळालं आहे.