बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात कापणीचा अनुभव
बेळगावातील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हाळेनट्टी गावात शेतात भात कापणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी विद्यार्थ्यांनी भात कापणीचा अनुभवही घेतला.
विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळाही घेण्यात आली.
कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हा संपूर्ण उपक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सेंद्रिय शेतीचे प्रणेते शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
भात कापणी कशी करतात याचे प्रात्यक्षिक दाखवल्या नंतर विद्यार्थ्यांनी हातात विळा घेऊन भात कापणीचा अनुभव घेतला.
पेरणीच्या मोसमात याच विद्यार्थ्यांनी भात रोप लागवड करण्याचा अनुभव घेतला होता.
सौर पॅनेल उर्जेद्वारे विहिरीतून गट शेतीसाठी पाण्याचे नियोजन (ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर) कसे केले जाते याचीही माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.
सेंद्रिय पीक पद्धतीचे फायदे याविषयी शिवाजी कागणीकर आणि अरुण बाळेकुंद्री यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी मराठी विद्यानिकेतन हायस्कूलचे शिक्षक नीला आपटे, रुपाली हळदणकर, कांचन बाळेकुंद्री, अनुज बाळेकुंद्री आणि आयुष बाळेकुंद्री उपस्थित होते. यावेळी म्हाळेंनट्टी गावातील शेतकरी राहुल पाटील यांनीही विद्यार्थ्यांना माहिती दिली.