Himachal Pradesh : मनालीच्या रोहतांगमध्ये बर्फवृष्टी, पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण
हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरु झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोंगरांनी जणू पांढरी चादर पांघरल्याचा भास होतोय
मनालीतील रोहतांगमध्ये 10 सेमीपर्यंत हिमवर्षाव झालाय
डोंगराळ भागांत बर्फवृष्टी होत असल्यानं मैदानी भागांतही सकाळी धुकाची चादर पसरल्याचं पाहायला मिळतं
राज्यातील तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे
गेल्या 24 तासांत राज्यातील उंच भागांत नवीन हिमवृष्टी झाली आहे.
लाहौल आणि स्पिती जिल्ह्यातील काझा परिसरातूनही काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिमल्यातील हवामान केंद्रानं 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
11 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वच भागांत हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
शिमला, मनालीमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
काही भागांत बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय