Independence Day 2023 : खोल समुद्रात ते उंच आकाशात तिरंगा!, जेथे जातो तेथे तू माझा संगती!
देशभरात 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, भारतीय नौदलातील जवानांनी पाण्याच्या खाली तिरंगा फडकावला! (Photo : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोयडा येथे हजारो तिरंगी पतंग उंच आकाशात गवसणी घालत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं (Photo : PTI)
दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या (PM Modi Speech) हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 88 मिनिटे देशाला संबोधित केलं. (Photo : PTI)
यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच देशातील युवकांना संदेशही दिला. तसेच पुढील वर्षी पुन्हा लाल किल्ल्यावरून भाषण करणार असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. (Photo : PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पुढील वर्षी या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश मांडणार आहे. मी तुमच्यातून आलोय,तुमच्यसाठी जगतोय. मी स्वप्न देखील तुमच्यासाठी पाहतोय. मी कष्ट करतोय ते देखील तुमच्यासाठी करत आहे. तुम्ही मला ही जबाबदारी दिली म्हणून मी हे करत नाही तर हा देश माझे कुटुंब आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांना दु:ख झालेले मी पाहू शकत नाही. (Photo : PTI)
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात ओसंडून वाहत असून ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला यात भारतीय सैन्य दलाचा उत्स्फूर्त सहभाग होता (Photo : PTI)
देश भरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह (Photo : PTI)
77 वा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मॅरेथॉन केरळ च्या कोट्टयम येथे आयोजित केली होती (Photo : PTI)
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'हर घर तिरंगा अभियाना' अंतर्गत तिरंग्यासोबत सेल्फी (Selfie) काढून ते अपलोड करण्याचं आवाहन केलं होतं (Photo : PTI)