Rahul In Manipur: मणिपूरमध्ये राहुल गांधींचं 'मोहब्बत की दुकान'; हिंसाचारग्रस्त भागांचा केला दौरा
काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी (29 जून) काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासह मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले. येथे त्यांनी राज्यातील नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी शुक्रवारी (30 जून) मणिपूरच्या मोइरांग शहरातील मदत छावण्यांना भेट देणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, मणिपूरच्या राजधानीतील मदत छावण्यांना भेट देण्यासोबतच, राहुल गांधी इंफाळमधील काही इंटलॅक्चुअल आणि नागरी संघटनांच्या प्रतिनिधींचीही भेट घेणार आहेत.
राहुल गांधी यांनी गुरुवारी (29 जून) मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये जातीय संघर्षामुळे विस्थापित झालेल्या लोकांची भेट घेतली. राहुल गांधी काही तास उशिराने हेलिकॉप्टरने तेथे पोहोचले, कारण ते रस्त्यानं चुराचंदपूरमध्ये जात असताना पोलिसांनी त्यांना रोखलं आणि सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टरने जाण्यास सांगितलं.
राहुल गांधी यांच्या चुराचांदपूर दौऱ्यासाठी राज्य सरकारनं त्यांना हेलिकॉप्टरही उपलब्ध करुन दिलं होतं. पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीही राहुल गांधींसोबत होते. बिष्णुपूरमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यात पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. आंदोलकांचं म्हणणं होतं की, राहुल गांधींना चुराचांदपूरमध्ये जाऊन द्यावं, मात्र इतर लोक या गोष्टीला विरोध करत होते. त्यावेळी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग शहरातील दोन मदत शिबिरांना भेट दिली. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टरनं मोइरांग येथे जाऊन तेथील बाधितांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं.
राहुल गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह, पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल, पीसीसी अध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमारही उपस्थित होते.
मोइरांग हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं जिथे INA (आझाद हिंद फौज) नं 1944 मध्ये भारतीय तिरंगा फडकावला होता.