धमक्यांच्या फोन कॉल्समुळे विमान कंपन्याचे 9 दिवसांत 600 कोटींचे नुकसान
गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर आणि विमान कंपन्या ना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या अफवांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या अफवा मुख्यतः विमानांना लक्ष्य करून पसरवल्या जात आहे त्यामुळे विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणामध्ये गोंधळ उडत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कारणांमुळे तातडीची तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी विविध कंपन्यांना 50 पेक्षा जास्त धमकीचे कॉल्स आले होते. या धमक्या सर्वे खोटे सिद्ध झालेलं दिसत आहे आणि त्याचमुळे जवळपास मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आणि प्रवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
जवळपास 170 विमानावर याचा परिणाम दिसून आले. सुरक्षा यंत्रणा प्रत्येक अफवांना गांभीर्याने घेतात, प्रवाशी सुरक्षता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याकारणाने तपासात विलंब झाला होता यामुळे विमाने रद्द होणे, उशिरा सुटणे तसेच तातडीच्या तपासणी करणे अश्या अनेक घटना घडल्या त्यामुळे प्रवाशी त्रस्त झालेले दिसून आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 13 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे त्यामध्ये विशेतः एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचा समावेश होता.
विस्तारा च्या 11 तर अकासा एअर च्या 12 कंपन्यानाही धमकी मिळाली होती. सोमवरी रात्रीच्या सुमारास एअर इंडिया , विस्तारा , इंडिगो कंपन्यांना 30 विमानामध्ये स्फोटक असल्याची माहिती पाठवण्यात आली.
देशांतगर्त विमान सेवा अडचणीत आढळ्यास तर कंपनीला जवळपास 1.50 कोटींचा तोटा सोसावा लगतो. परंतु आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये हा तोटा 5 ते 5.50 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सरासरी एका विमान अफवेमुळे 3.50 कोटींचे नुकसान होते.
मागच्या 9 दिवसापांसून विमान कंपन्याचे 600 कोटी हून अधिक नुकसान झाल्याची माहिती एका देशांतर्गत कंपनीच्या अधिकारी यांनी दिली.
अफवांचे व धमकीचे प्रकार थांबण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करण्याचे दिसून येत आहे तरी अजून ठोस उपाय आढळला नाही आहे तसेच अफवा फसरवणार्यांना कायदा दुरुस्तीपासून तर नो फ़्ल्याईन्ग यादीत टाकण्यापासून अनेक विचार आहेत.
योग्य ती तपासणी करून अश्या धमक्यांचे मूळ कारण शोधून कठोर कार्यवाही करणे अत्यावश्यक झाले आहे जेणेकरून प्रवाशांना सुरक्षेतेची हमी राहील.