Mandous Cyclone: चक्रीवादळाचं तांडव, जनजीवन विस्कळीत, चार जणांचा मृत्यू
मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे दोन वाजता चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकलं. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे 115 मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय.
एम के स्टॅलिन म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचं लक्ष आहे. नुकसानाचे मुल्यमापन केले जात आहे. मदतकार्य वेगानं सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय. 89 जनावरांचा मृत्यू झालाय. तर यामुळे 151 घरांचं नुकसान झालेय.
मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले की, 'कासीमेडू येथे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या तयारीमुळे मोठी हानी झाली नाही. उन्नत योजनामुळे कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन करता येते, हे आम्ही सिद्ध केले आहे.'
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातून 200 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 9000 जणांना अन्न पुरवलेय. त्याशिवाय चक्रीवादळामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी 15 हजार झाडांची छाटनी करण्यात आली आहे.
मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती दलाची तैयार करण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने सर्व पार्क आणि खेळाची मैदानं बंद करण्याचा आदेश दिलाय.
मंदोस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या 17 जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे.
IMD दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळं कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. 11 डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.