PHOTO: गुजरातमध्ये पुन्हा भाजपची बाजी, 128 ते 140 जागा मिळण्याचा एक्झिट पोलचा अंदाज
गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात 59 टक्के मतदान झाले आहे.
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.
एबीपी माझा आणि सी वोटर्सनं ने केलेल्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत. यामध्ये भाजपने बाजी मारल्याचं दिसून येतंय.
या एक्झिट पोलमध्ये 1 डिसेंबर आणि पाच डिसेंबर म्हणजेच आज झालेल्या मतदानानंतर मतदारांचा कौल घेतला. गुजरातच्या 182 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे.
तब्बल 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत आहे. 2017 साली गुजरातमध्ये भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपला 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसला 2017 साली 77 जागा मिळाल्या होत्या, यंदा 31 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 3 ते 11 जागांवर समाधान मानावं लागेल असं हा पोल सांगतोय.
यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास 38 सभा घेतल्याचं सांगितलं जातंय.
एक्झिट पोलवरुन गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा अद्याप कायम असल्याचं स्पष्ट होत आहे.