Kangana Ranaut : कंगना राणौतची खासदारकी धोक्यात? संसदेच्या सदस्यत्वाला उच्च न्यायालयात आव्हान
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने कंगना राणौतला नोटीस बजावली आहे. (Image Source : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरुन भाजप खासदार कंगना रणौतला नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाने कंगना राणौतला 21 ऑगस्टपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.(Image Source : PTI)
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश ज्योत्स्ना रेवाल दुआ यांनी जिल्हा किन्नौरचे रहिवासी लायक राम नेगी यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेच्या पहिल्या सुनावणीनंतर हा आदेश दिला आहे.(Image Source : PTI)
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने फेटाळण्यात आल्याचा आरोप करत मंडी जागेसाठीची लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी उमेदवार याचिकाकर्ता लायक राम नेगी यांनी केली आहे.(Image Source : PTI)
अर्जदार लायक राम यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही. अर्जामध्ये कोणतीही मोठी त्रुटी नव्हती, ज्यामुळे त्यांचं नामांकन नाकारले गेले. त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली असती, तर कदाचित ते लोकसभा निवडणूक जिंकण्यात यशस्वी झाले असते, असं लायक राम यांचं म्हणणं आहे.(Image Source : PTI)
मंडी जागेसाठी लोकसभा निवडणूक रद्द करण्याची विनंती अर्जदाराने केली आहे, ज्यामुळे या मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक घेता येईल. अर्जदार लायक राम हे वनविभागातून निवृत्त झाले आहेत.(Image Source : PTI)
निवृत्तीनंतर, त्यांनी उमेदवारी अर्जासह वनविभागाने जारी केलेले नो ड्यू सर्टिफिकेट रिटर्निंग ऑफिसरकडे सादर केले. नामनिर्देशन करताना, अर्जदाराला सांगण्यात आले की, त्याला सरकारी निवासासाठी संबंधित विभागांनी स्वतंत्रपणे दिलेले वीज, पाणी आणि दूरध्वनी यांचे नो ड्यू सर्टिफिकेट द्यावे लागेल.(Image Source : PTI)
ही सर्व प्रमाणपत्र देण्यासाठी दुसऱ्या दिवशीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. 15 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही प्रमाणपत्रे स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे मंडी लोकसभा मतदारसंघात होणारी लोकसभा निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. हिमाचल प्रदेश हायकोर्टाने मंडीच्या रिटर्निंग ऑफिसरलाही या संपूर्ण प्रकरणात पक्षकार बनवलं आहे.(Image Source : PTI)
भाजप खासदार कंगना राणौतला किन्नौरच्या एका रहिवाशाने दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. कंगनाची खासदार रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत या लोकसभा जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी याचिकाकर्त्याचे उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने फेटाळण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.(Image Source : PTI)
कंगना राणौतने मंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचा 74,755 मतांनी पराभव केला.(Image Source : PTI)
वन विभागाचे माजी कर्मचारी, नेगी यांनी सांगितले की, त्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती मिळाली आणि त्यांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर त्यांच्या नामनिर्देशनपत्रासह विभागाकडून नो ड्यू सर्टिफिकेट सादर केले.(Image Source : PTI)
मात्र, वीज, पाणी आणि दूरध्वनी विभागाकडून थकीत नसल्याची प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी त्यांना एक दिवसाचा अवधी मिळाला आणि त्यांनी ते सादर करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी ते स्वीकारलं नाही आणि त्यांचं नामनिर्देशन रद्द केलं. जर त्यांची कागदपत्र स्वीकारली असती तर, ते निवडणूक लढू आणि जिंकू शकले असते, त्यामुळे कंगनाचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.(Image Source : PTI)