Photo Gallery: संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना
माधव दिपके
Updated at:
19 Jun 2022 05:47 PM (IST)
1
भागवत धर्माची पताका सातासमुद्रापार पोहोचविणारे संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी ही पालखी पंढरपूरला शेकडो वारकऱ्यांसह पायी प्रवास करत असते.
3
मानाच्या पालख्यांपैकी एक म्हणून नरसी नामदेव येथील नामदेव महाराजांच्या पालखीला विशेष महत्त्व आहे.
4
या पालखीला 26 वर्षांचा इतिहास आहे. पालखीच्या या सोहळ्यात वारकरी पायी प्रवास करुन पंढरपूरला जात असतात.
5
बावीस दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होणार आहे.
6
पालखीचा आजचा मुक्काम हिंगोली शहरामध्ये होणार आहे.
7
दरवर्षी हिंगोली शहरामध्ये संत नामदेव महाराजांची पालखी आल्यानंतर प्रशासकीय रिंगण सोहळा आयोजित केला जातो.